आष्टी तालुक्यातील दिव्यांग विशेष लसीकरण मोहिमेचे दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांच्या शुभहस्ते उद्घाटन
--------------------------
अधिक्षक डाँ.राहूल टेकाडे,तालुका आरोग्य अधिकारी डाँ.नितीन मोरे,डाँ.प्रसाद वाघ यांचे दिव्यांगांना विशेष सहकार्य
-----------------------------
आष्टी तालुक्यात १४८ दिव्यांगांचे झाले लसीकरण
-----------------------------
टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्रावर दिव्यांग संघटनेच्या वतीने वृक्षारोपण
----------------------------
आष्टी : दि.५(प्रतिनिधी)शनिवार दि.५ जून २०२१ रोजी बीड जिल्ह्यातील ४५ वर्षावरील दिव्यांगांसाठीं विशेष लसीकरण मोहीमेचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड चे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने जिल्हा आरोग्य विभाग व समाजकल्याण विभाग बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.त्याचेच औचित्य साधून आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर दिव्यांग विशेष लसीकरण मोहिमेचे उद्घाटन शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांच्या शुभहस्ते व वैद्यकीय अधिक्षक डाँ.राहूल टेकाडे,तालुका आरोग्य अधिकारी डाँ.नितीन मोरे,डाँ.प्रसाद वाघ,दिव्यांग संघटनेचे शेषराव सानप,आण्णासाहेब साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी डाटा आँपरेटर अशोक गाडे,प्रमोद नरुटे,सोनाजी बनकर,आजिनाथ गव्हाणे,संजय निंबाळकर यांनी दिव्यांग बांधवांची आँनलाईन नोंद घेतली तर आरोग्य परिचारिका श्रीम.बी.शेख,श्रीम.चौधरी मँडम यांनी लस देण्याची भूमिका बजावली तसेच दिव्यांग शाळेतील समन्वयक विजय झांजे,सोमिनाथ करडुळे यांनी दिव्यांगांना आँनलाईन फाँर्म भरण्यास व चलनवलनास सहकार्य केले.
तद्नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळसिंग येथील लसीकरण केंद्रावरील दिव्यांग लाभार्थ्यांचे स्वागत करुन अल्पोपहार वाटप करण्यात आला.तसेच शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळसिंग परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी आष्टी पंचायत समितीचे सभापती बद्रीनाथ जगताप,दिव्यांग संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड,शेषराव सानप,ग्रामविस्तार अधिकारी नवनाथ लोंढे,तालुका आरोग्य अधिकारी डाँ.नितीन मोरे,टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाँ.प्रसाद वाघ,समन्वयक सुधीर शिंदे,शिवाजी रणसिंग व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
आष्टी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे २२,प्राथमिक आरोग्य केंद्र कडा ४४,खुंटेफळ ४१,टाकळसिंग ४,सुलेमान देवळा २०,धामणगाव १७ असे एकूण १४८ दिव्यांग बांधवांनी विशेष लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवून लस घेतली.यासाठी तालुक्यातील सर्व आरोग्य अधिकारी,परिचारिका,आरोग्य कर्मचारी,दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी,दिव्यांग शाळेतील सर्व केंद्रनिहाय समन्वयक यांनी मोलाचे परिश्रम घेवून सहकार्य केले.त्याबद्दल सर्वांचे दिव्यांग संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी विशेष आभार व्यक्त केले.
stay connected