🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*पर्यावरण दिन*
आज किंमत कळली देवा
झाडे किती महत्त्वाची
श्वास घेण्यासाठी जेव्हा
कमी पडली ऑक्सिजनची
शुद्ध हवा मिळण्यासाठी
पर्यावरणाचे संवर्धन करुया
निरोगी आयुष्य जगण्यासाठी
एकतरी झाड लावुया
वाटल नव्हत कधी मला
रांगेत उभा रहाव लागेल
ऑक्सिजन सिलेंडर घेऊन
आपल्यांचा जीव वाचवावा लागेल
जे गेले आपल्याला सोडून
त्यांच्या साठी एकच करा
त्यांची आठवण म्हणुन
एक तरी झाड लावा
पुढील पिढीसाठी आपण
पर्यावरणाचे संरक्षण करुया
महामारी येऊ नये यासाठी
पर्यावरण दिनानिमित्त झाड लावुया
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
सुप्रिया सुरेश झिंजुर्डे नेवासा
9960470125
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
stay connected