भाजप नेते आ.आशिष शेलार यांची सलीम जहाँगीर यांच्या निवासस्थानी भेट
बीड ( प्रतिनिधी ) मुंबई भाजपचे अध्यक्ष
आ. आशिष शेलार यांनी बुधवारी भाजप नेते सलीम जहाँगीर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सलीम जहाँगीर परिवाराच्या वतीने त्यांचा ह्दय सत्कार करण्यात आला.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार बुधवारी बीड दौऱ्यावर असताना त्यांनी भाजप नेते सलीम जहाँगीर यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी आ. शेलार आणि सलीम जहांगिर यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री आ सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, प्रा.देविदास नागरगोजे, मूसा खान, नूर लाला खान, बालाजी पवार,दीपक थोरात,आलिम जहाँगीर,तकि शेख, अनीस शेख आदि उपस्थित होते.
stay connected