मा.आ.भीमसेन धोंडे यांची थोरवे-दरेकर विवाह प्रसंगी उपस्थिती
आष्टी (प्रतिनिधी): तालुक्यातील जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी साहेबराव थोरवे दादा यांचे नातू व भाजपा तालुकाध्यक्ष अँड.हनुमंतराव थोरवे यांचे चिरंजीव धैर्यशील आणि मा.आ.साहेबराव दरेकर नाना यांची नात व राजाभाऊ दरेकर यांची कन्या अंजली यांच्या विवाह सोहळा प्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे उपस्थित होते.
कोरोना महामारीमुळे थोरवे आणि दरेकर परिवाराने हा विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने व मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत आयोजित केला होता. आष्टी तालुक्यातील धानोरा-पिंपळा रोडवरील खरडगव्हान फाटा येथील गोविंद मंगलकार्यालयात हा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह प्रसंगी उपस्थित मा.आ.भीमसेन धोंडे यांचे मा.आ.साहेबराव दरेकर, अँड.हनुमंतराव थोरवे, राजाभाऊ दरेकर व जि.प.सदस्य उद्धव दरेकर यांनी स्वागत केले. यावेळी मा.आ.भीमसेन धोंडे यांनी वधु-वर यांना आशिर्वाद देऊन वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देत थोरवे-दरेकर परिवारास देखील शुभेच्छा दिल्या.
stay connected