*रुणझुणत्या पाखरा..जा रे माझ्या माहेरा.. माझं माहेर सावली,उभी दारात माऊली...*

 *रुणझुणत्या पाखरा..जा रे माझ्या माहेरा.. माझं माहेर सावली,उभी दारात माऊली...* 

अमेरिकास्थित लेक सौ.अमिताची बार्शीकरांना जिव्हाळा भेट!




नमस्कार,

लेक राजाची असो वा रंकाची.. माहेरची ओढ आणि त्यासंदर्भातील भावनांची तीव्रता शीर्षकात व्यक्त झालेला शब्दांपलिकडची नसते..

*मला माहेरी पाठवा, मला माऊली भेटवा..*

*उभी दारात माऊली, तिच्या काळजात बाई ममतेचा झरा..*

या भावनांना वाट मोकळी करुन देण्याचा प्रत्येक स्त्रीचं मन करंत असतं...कोरोनासारख्या संकट काळात तर मन स्वाभाविकपणे अधिकच  ओढ घेणार..नेमक्या त्याच ओढ भावनांना वाट मोकळी करुन बार्शीच्या एका अमेरिकास्थित कन्येने नुकतेच मात‌भूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले.बार्शीच्या स्व.श्याम जाजू यांची कन्या व लातूरच्या श्री.केशव बालाजी देवस्थान तसेच लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष राजकुमार पल्लोड यांची सून सौ.अमिता किशोर पल्लोड यांनी आपली जीवलग मैत्रिण सौ.स्मिता किरण देशमुख यांना संपर्क केला.माहेर बार्शीतील कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी अल्पसा दिलासा आधार देण्याची इच्छा व्यक्त केली,त्यासाठी चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर डिव्हायसेस देवू केले. सौ.स्मिता यांनी लगोलग आपले वडिल मातृभूमी प्रतिष्ठानचे सचिव प्रतापराव जगदाळे यांना आपल्या मैत्रिणीचा मनोदय सांगितला.प्रतापरावांनीही लागलीच अध्यक्ष संतोष ठोंबरे,अजित कुंकूलोळ, अशोक हेड्डा, डॉ.लक्ष्मीकांत काबरा, मुरलीधर चव्हाण,गौतम कांकरिया,प्रा.मधुकर डोईफोडे,प्रा.किरण गाडवे, शहाजी फुरडे-पाटील व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. रमण हेड्डा यांनी समन्वय साधला आणि सौ.अमिता या बार्शीच्या लेकीने पाठविलेली ही जिव्हाळ्याची मदत मातृभूमीच्या स्वधीन केली. *प्रतिष्ठानचे  उपाध्यक्ष विनय संघवी यांचा आज वाढदिवस.तेच औचित्य साधून सौ.अमिता किशोर पल्लोड यांनी धाडलेली मदत त्यांची मैत्रिण सौ.स्मिता किरण देशमुख यांच्या हस्ते विनय संघवी यांना हस्तांतरित करुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या,या वेळी सौ.स्मिताचे पती बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रा.किरण देशमुख हे उपस्थित होते.*

-राजा माने.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.