गणगेवाडी येथील गणगे पिता पुत्राची कोरोनावर मात.
आष्टी प्रतिनिधी तुकाराम गणगे.
तालुक्यातील गणगेवाडी येथील रहिवासी ज्ञानदेव शंकर गणगे(६७) व रामदास ज्ञानदेव गणगे (३७)या पिता- पुत्रांनी डॉ सोनवणे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.
काही महिन्यांपूर्वी ज्ञानदेव यांच्या बंधूंचे कोरोना या आजाराने निधन झाले होते. त्या धक्क्यातून कुटुंबीय सावरत असतानाच ज्ञानदेव व रामदास या पिता पुत्रांना कोरोनाची लागण झाली.
ज्ञानदेव यांचा सिटी स्कोर २२असताना त्यांच्यावर डॉ. विजय सोनवणे यांनी योग्य औषधोपचार करत त्यांना कोरोणा मुक्त केले. गणगे पिता पुत्रांना बेड मिळवून देण्यासाठी चिंचाळा गावचे सरपंच अशोक पोकळे यांनी विशेष प्रयत्न केले आणि तुम्हीही या आजारावर उपचार घेउन बरे होऊ शकता यासाठी सकारात्मकता निर्माण केली. कोरोणामुक्त झाल्यावर गणगे यांनी डॉ. सोनवणे व सरपंच पोकळे यांचे आभार मानले.
stay connected