चिंचाळा गाव कोरोना मुक्त
ॲटीजन टेस्ट कॅम्प मध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह निघाला नाही
आष्टी प्रतिनिधी
युवराज खटके
चिंचाळा गावात मागील काही दिवसापासून कोरोना पेशंटची संख्या अतिशय कमी झाल्याने गावचे सरपंच दिगंबर नाना पोकळे यांनी तालुका आरोग्य अधिकारी नितीन मोरे यांच्याशी संपर्क करून गावातील लोक कोरोना टेस्ट करत नाहीत. त्यामुळे गावातील आकडा शून्य येतोय काय अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे डॉक्टर मोरे यांनी आज गावात अँटीजण टेस्ट कॅम्पचे आयोजन केले.
या कॅम्प मध्ये लोकांची तपासणी झाली. सुदैवाने एकही पॉझीटीव्ह आढळला नाही. त्यामुळे गावातील सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक अंगणवाडी कर्मचारी, आशाताई यांनी केलेल्या जनजागृतीचा फायदा होत असल्याचे दिसून आले.सर्व गावकरी नियम पाळत आहेत.मास्क लावूनच फिरत आहेत,लस घेत आहेत.
आज झालेल्या कॅम्प मधे आरोग्य विभागाच्या वतीने तालुका आरोग्य वैज्ञानिक नागेश कारंडे,जनसंपर्क आरोग्य अधिकारी आकाश पवार,आरोग्य कर्मचारी अर्शद शेख,सानप एस. डी.हे उपस्थित होते त्यांनी ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शन करून भीती मुक्त केले.तसेच लक्षणे असलेल्या लोकांचीच तपासणी केली.कॅम्प यशस्वी करण्यासाठी सरपंच दिगंबर पोकळे,उप सरपंच अशोक पोकळे,मुख्याध्यापक रत्नाकर चव्हाण,आशा वर्कर सुनिता भगत ,ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण पोकळे,अविनाश पोकळे यांनी प्रयत्न केले.
stay connected