लॉकडाऊनमुळे शिरूर अनंतपाळ येथील भटक्या जमातीच्या मजूरांवर उपासमारीची वेळ
बाबूराव बोरोळे
जिल्हा प्रतिनिधी
तेजवार्ता न्युज लातूर
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन केले आहे . अत्यावश्यक सेवावगळता सर्व काही बंद केल्याने पोटाची खळगी भरायची कशी, असा मोठा प्रश्न शिरूर अनंतपाळ येथील मसणजोगी समाजाच्या कुटुंबा समोर उभा राहिला आहे . लॉकडाऊन मुळे हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, अशा परिस्थितीत करायचे काय? या चिंतेमुळे मसणजोगी समाजाचे नागरिक हतबल झाले आहेत . कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन केले आहे . अत्यावश्यक सेवावगळता सर्व काही बंद केल्याने रोजगारासाठी घराबाहेर पडता येत नसल्यामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे . त्यामुळे आता पोटाची खळगी भरायची कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहीला आहे.घरात धान्याचा कणही शिल्लक नसल्याने त्यांना उपाशी राहून दिवस काढण्याची वेळ आली आहे. घराच्या बाहेर पडावे तर कोरोनाची भीती आणि घरात उपासमार अशा दुहेरी कात्रीत हे मसणजोगी समाजाचे मजूर सापडले असून, प्रशासनाने मदत करावे अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. यामुळे प्रशासनाने पुढाकार घेऊन याकडे लक्ष देण्याचे खुप गरजेचे ठरले आहे .
stay connected