कोविड रुग्णांना जीवदान देणाऱ्या आ.सुरेश धस यांचा पाय धुऊन सन्मान
**************************
गोरगरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा खरा देवमाणूस आ.सुरेश धस
-----अभिजित शेंडगे
****************************
आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्यात कोविड विषाणू प्रादुर्भावामुळे थैमान घातले असून उस्मानाबाद,लातूर आणि विशेषतः बीड जिल्ह्यात रुग्ण संख्या फार मोठी असल्याने जनता भयभीत झाली आणि जिल्हा प्रशासन हतबल झाले असताना विधान परिषद सदस्य आ.सुरेश धस यांनी या संकट काळामध्ये खरा जनसेवेचा वसा जोपासत जनसेवक कसा असतो हे दाखवत मोठ्या धैर्याने तोंड देऊन गावोगावी, वाडी, वस्तीवरील गावकऱ्यांना धीर दिला आहे. आ. सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यात सीसीसी,डिसीएचसी,डीसीए रुग्णांच्या सेवेसाठी मच्छिंद्रनाथ देवस्थान,आष्टी तालुका दूध संघ यांच्या वतीने कोविड सेंटरची उभारणी करून ४ हजाराच्या वरती रुग्णांवर उपचार केले असून त्यांची जेवणाची सुविधा केली. त्यांच्या मानवतावादी सेवाभावी वृत्तीची आणि गोरगरिबांसाठी देवदूत ठरवाऱ्या या अवलौकीक कार्यामुळे लोकनेते गोपीनाथरावजी ऊसतोड कामगार संघटनेचे प्रवक्ते युवानेते अभिजीत शेंडगे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त टाकळी येथे आ. सुरेश धस आले असता त्यांचा पाय धुऊन सन्मान केला आहे.
कोरोना महामारी काळात अनेक कोविड सेंटर उभारून गोरगरिबांना आधार देण्याचे काम आ. सुरेश धस यांनी केलं आहे.अनेक गोरगरीब जनतेचे प्राण वाचवले आहेत अशा या देवरूपी देवमाणूसाने अनेक गोरगरीबांचे अश्रू पुसल्याने या नेत्याचा टाकळी अमिया येथे आम्ही सर्व ग्रामस्थांनी नतमस्तक होऊन पाय धुऊन सन्मान केला आहे.असे यावेळी बोलताना अभिजित शेंडगे यांनी सांगितले. यावेळी माजी पं.स.सदस्य डॉ. पांडुरंग चौधरी, मा. सरपंच संदीप चौधरी,संदीप शेंडगे, अजित शेंडगे व इतर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
stay connected