वाघळूज येथे अज्ञात वाहनाखाली चिरडून भोळसर इसम जागीच ठार

 वाघळूज येथे अज्ञात वाहनाखाली चिरडून भोळसर इसम जागीच ठार



धानोरा ( शौकत सय्यद )

आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे नगर -जामखेड रोडवर शनिवारी पहाटे ४ वा. च्या सुमारास अज्ञात वाहनाखाली चिरडून रस्त्यावर भटकणाऱ्या एका भोळसर इसमाचा जागीच मृत्यु झाला. सदरील इसमाचे नाव व पत्ता माहीत नसुन हा इसम वेडसर होता व वाघळूज गावात सायंकाळच्या सुमारास भटकत असल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले. घटनेची माहिती समजताच नाईट राउंड चे ड्रायवर राजू कांबळे व होमगार्ड लगड व एकशिंगे हे घटनास्थळी तात्काळ हजर झाले व उत्तरीय तपासणीसाठी सदरील मयत इसमाचे मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.