*शिवक्रांतीचे गणेश बजगुडे पाटील यांना मोर्चाच्या अनुषंगाने नजरकैद*

 *शिवक्रांतीचे गणेश बजगुडे पाटील यांना मोर्चाच्या अनुषंगाने नजरकैद*



बीड / (दी.०५) बीड येथे निघणारा मोर्चा मराठा समाजाच्या हितासाठी नसुन मेटेंच्या राजकारणासाठी आहे. आजचा मोर्चा हा मराठा समाजाचा मोर्चा नसुन राजकीय पक्षाचा मोर्चा आहे. आशा परिस्थितीत मोर्चे काढून तरुणांवर गुन्हे दाखल होतील, कोरोनाची भयंकर परिस्थिती आहे. लोकांचे व्यवसाय बंद आहेत. शाळा, क्लासेस बंद आहेत. परीक्षा रद्द होत असतील तर मोर्चा का रद्द होवू नये म्हणत जिल्हा प्रशासनाला निवेदन देत मोर्चाला परवानगी देण्यात येवू नये. परवानगी दिली तर आम्ही प्रशासनाच्या विरोधात प्रतीमोर्चा काढू म्हणून मोर्चाला प्रखरपणे विरोध करणारे व बीड येथे चिंतन बैठक घेवून समाज बांधवांना जागृत करणारे शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांच्यावर परवा मेटे समर्थकांनी हल्ला देखील केला परंतु काहीही झाले तरी आपल्या भूमिकेवर ठाम आसनारे शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांना मोर्चाच्या अनुषंगाने आज पेठ बीड पोलिस स्टेशन येथे नजरबंदी ठेवण्यात आले होते. मेटेना सुरवातीच्या काळात काही मंडळींनी विरोध केला परंतु जसा मोर्चा जवळ येवू लागला तसा विरोध ही मावळू लागला. मेटेणी विरोध संपवण्यासाठी सर्व तो परी वापर केला परंतु आपली भूमिका समाजाच्या हिताची आहे मेटे समाजाची दिशाभूल करत आहेत असे म्हणत आपल्या भूमिकेवर ठाम आसनारे व मेटेना स्पष्ट प्रखर विरोध करणारे गणेश बजगुडे यांना पूर्व काळजी किंवा काही अनर्थ होवू नये म्हणून मोर्चा दिवशी सकाळ पासूनच पेठ बीड पोलिस ठाण्यात नजरकैद ठेवण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.