जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यानी नियमानुसार समायोजन करावे.
ग्रामविकास मंत्री यांचे आदेश
अहमदनगर- पैठण येथील जि.प.उर्दू माध्यमीक शाळेतील शिक्षकांचे समायोज् न नियमानुसार करावे .असे आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रिफ यानी औरंगाबाद जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी याना दिले .सदर चे समायोजन नियम बाह्य असल्याचे शिक्षण हक्क मंचाचे अध्यक्ष पत्रकार सय्यद वहाब व पालक संघाचे अध्यक्ष नगरसेवक रफिक कादरी यांच्या शिष्टमंडळानेअहमदनगर येथे मंत्री महोदयांची भेट घेऊन निदर्शनांस आणुन दिले .
सदर च्या चुकिच्या निर्णयामुळे आर्थिकदृष्टया मागास शेकडो विध्याथी शिक्षणापासून वंचित राहतील .पुढील शैक्षणिक वर्षात शाळा बन्द होईल .हे सर्व वास्तव त्यांच्या समोर मांडण्यात आले .
या शिष्टमंडळात पत्रकार वहाब सय्यद,नगरसेवक रफिक कादरी, रशिद खान.,वसीम शेख ,स्मीर शेख,अतिक शेख ,आथर खान,आदीमान्यवरांसह पालक उपस्थीत होते.
stay connected