लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंढे पुण्यतिथि निमित्त लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात मोफत आरोग्य शिबिर :- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
______________________________ बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथे लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंढे यांच्या ७ व्या पुण्यतिथी निमित्त भाजपा तालुकाध्यक्ष स्वप्निल गलधर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसमृद्धी चळवळ आणि स्व.अमोलशेठ गलधर युवा मंच लिंबागणेश यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय लिंबागणेश येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले असून सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे वैद्यकीय सेवा देत आहेत,
सविस्तर माहीतीस्तव:-
______________________________ आज दिनांक ३ जुन गुरूवार रोजी लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय लिंबागणेश येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटन भाजपा किसानसभा तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोरे,प्रमुख पाहुणे ऑल इंडीया पॅथर सेना मराठवाडा उपाध्यक्ष नितिनजी सोनावणे, यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपसरपंच शंकर वाणी होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळावी यासाठी ग्रामसमृद्धी चळवळ अंतर्गत खेडेपाडी, वस्तीतांड्यावर जाऊन कोरोना विषयक जनजागृती, तसेच शंकाचे निरसन व विनामूल्य आरोग्य तपासणी व औषधोपचार डाॅ.गणेश ढवळे यांच्यामार्फत केले जात असून आज लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुढे व स्व. अमोलशेठ गलधर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आरोग्य शिबिर घेण्यात आले.यावेळी आशास्वयंसेविका योगिनी शेळके, आशा स्वयंसेविका मीरा वैद्य यावेळी ग्रां.पं.स. गणेश लिंबेकर, समीर शेख, ग्रां.पं. कर्मचारी जिवन मुळे, सुखदेव वाणी, गणेश थोरात, सुरज कदम, सचिन आगवान, केशव गिरे, संतोष शिंदे, भिमा बोराडे आदिंनी सहकार्य केले.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.8180927572
stay connected