लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे पुण्यतिथी कार्यक्रमास मा.आ.भीमसेन धोंडे यांची उपस्थिती

 लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे पुण्यतिथी कार्यक्रमास मा.आ.भीमसेन धोंडे यांची उपस्थिती





आष्टी (प्रतिनिधी): गोपीनाथ गड परळी येथे गुरुवार दि.०३ जुन रोजी लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून स्व.मुंडे साहेबांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारच्या डाक विभागाने त्यांचे पोस्टल इन्व्हलप (लिफाफा) काढले असून त्याचे विमोचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आष्टी, पाटोदा, शिरुर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांनी उपस्थित राहून स्व.मुंडे साहेबांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.

          लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतीथी निमित्त गोपीनाथ गड परळी येथे स्व.मुंडे साहेबांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारच्या डाक विभागाने त्यांचे पोस्टल इन्व्हलप (लिफाफा) काढले असून त्याचे विमोचन कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन माजी मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सचिव मा.पंकजाताई मुंडे, बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रीतमताई मुंडे, मा.आ.भीमसेन धोंडे, अँड.यशश्रीताई मुंडे, खा.डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के, माजी मंत्री महादेव जानकर, खा.सुजय विखे पाटील, आ.मोनिकताई राजळे, आ.नमिताताई मुंदडा, मा.राजाभाऊ मुंडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. गोपीनाथ गड येथील या कार्यक्रमाचे नवी दिल्ली येथुन ऑनलाईन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी.नड्डा यांच्या हस्ते व केंद्रीय दूरसंचार मंत्री मा.रविशंकर प्रसाद, राज्यमंत्री मा.संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत विमोचन झाले.

        गोपीनाथ गडावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ऑनलाईन भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्ष नेते मा.देवेंद्रजी फडणवीस, मा.प्रवीणजी दरेकर, मा.सुधीरजी मुनगंटीवार, मा.चंद्रकांतजी बावनकुळे सहभागी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.