स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आष्टी-पाटोदा-शिरुर येथे तेहतीस हजार वृक्षलागवड

 स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आष्टी-पाटोदा-शिरुर येथे तेहतीस हजार वृक्षलागवड




आष्टी (प्रतिनिधी) स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आष्टी-पाटोदा-शिरुर नगरपंचायत तसेच कडा ग्रामपंचायत कार्यालय व आ.सुरेश धस मिञ मंडळ भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने तेहतीस हजार झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले आहे.

आष्टी-पाटोदा-शिरुर परिसरासह कडा येथेही गुरुवारी स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आ.सुरेश धस यांच्या हस्ते शिरुर (का) येथे नगरपंचायत कार्यालय येथे स्व.मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे पुजन करुन आ.सुरेश धस व सिद्धेश्वर संस्थानचे विवेकानंद शास्ञी महाराज यांच्या हस्ते या वृक्षलागवडीला सुरुवात करण्यात आली.गतवर्षीही मुंडे स्व.यांच्या पुण्यतिथीदिनी आष्टी शहरात वृक्षारोपन करण्यात आले होते.यावेळी बोलताना आ.धस यांनी स्व.मुंडे साहेब म्हणजे एक अजातशञू असे व्यक्तिमत्त्व होते.त्यांची छबी आजही डोळ्यासमोर उभी राहिली कि त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या गतिमान कामाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मुंबईतील अंडरवल्ड डाॕनची दादागिरी संपविण्याचे धाडस हे मुंडे साहेबांनी केले.दिन दलीत दुबळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारे मुंडे साहेब हे बहूजनांचे लोकनायक होते.ऊसतोड मजूरांना आपलस वाटणार एकमेव नेतृत्व म्हणजे मुंडे साहेब होते.त्यांच्या जाण्याने कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाल्यानंतर त्यांचा वारसा समक्षपणे पंकजाताई मुंडे,प्रितमताई मुंडे या पुढे नेत असल्याची प्रतिक्रिया आ.सुरेश धस यांनी यावेळी व्यक्त केली.तर आ.धस यांनी वृक्षलागवडीची हाती घेतलेली मोहिम हि निश्चितपणे आगामी काळात निसर्गात आमुलाग्र बदल घडवून आणणारी असेल.कारण कोरोनाच्या या कालावधीत लोकांना आॕक्सीजनचे महत्त्व कळाले आहे.माञ आ.धस यांनी वृक्षालागवडीची सुरु केलेली संकल्पना निश्चितपणे अभिमानास्पद असल्याचे मत सिद्धेश्वर संस्थानचे विवेकानंद शास्ञी महाराज यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.