बीड तालुक्यातील मसेवाडी गावात विनामूल्य आरोग्य शिबिर:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

 बीड तालुक्यातील मसेवाडी गावात विनामूल्य आरोग्य शिबिर:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 


______________________________ बीड तालुक्यातील मौजे मसेवाडी गावात ग्रामसमृद्धी चळवळ अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यामार्फत विनामूल्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले, यावेळी सरपंच गवळणबाई भारती, उपसरपंच सारीका मांडवे, ग्रां.स. पार्वतीबाई मांडवे, ग्रामसेवक कवडे मॅडम, आशा स्वयंसेवक वैशाली शेळके, अंगणवाडी सेविका अनुसया लिमकर, प्रा. प्रकाश मांडवे, दिनकर मोरे, अशोक मोरे, हौसराव मोरे, विलास मांडवे, आसाराम मांडवे, बाळु मोहीते आदिंनी उपक्रमास सहकार्य केले. 

ग्रामीण भागातील दवाखाने, औषधीदुकान नसलेल्या गावामध्ये जाऊन ग्रामस्थांच्या मनातील कोरोना विषयक जनजागृती करून भिती दुर करून त्यांना तपासणी करणे, अंगावर दुखणे काढु नये तसेच अन्य शंकाकुशंकांचे निरसन करणे व लाॅकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गोरगरीब, वयोवृद्ध रूग्णांची जे दवाखान्यात जाऊ शकत नाहीत, अथवा जाण्याची सोय नसते अशा रूग्णांना गावात जाऊन ग्रामपंचायत, अथवा जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, अथवा मंदिर सभागृहात तपासणी व औषधोपचार करण्यात येतो, आज मसेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात आरोग्य सेवा देण्यात आली. 


डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 

मो. नं.8180927572

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.