प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी धनाजी पाटील यांच्या बदलीनिमित्त कर्जत पोलिसांकडून निरोप
'कर्जतच्या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी बांधवांनी कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा केली. त्यांचे हे काम कौतुकास्पद आहेच परंतु त्यांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्यावी' असे प्रतिपादन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी धनाजी पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
न्याय दंडाधिकारी धनाजी पाटील यांची नुकतीच कर्जत न्यायालयातून बारामती येथे बदली झाल्याने त्यांचा कर्जत पोलीस ठाण्यात निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रथमवर्ग दंडाधिकारी महेश पाळासापुरे,पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी महेश पाळसापुरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी धनाजी पाटील पुढे म्हणाले,'पोलीस बांधवांनी आपल्या भविष्याचा विचार करून योग्य प्रकारे गुंतवणूक करावी याचबरोबर पोलिसांनी गुन्हेगारीचा तपास चांगल्या पद्धतीने कसा करावा? याबाबतही सुचना केल्या. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत पोलिसांच्या वतीने धनाजी पाटील यांना शुभेच्छा देत त्यांचे आभार मानले.
--------
प्रतिनिधी अस्लम पठाण कर्जत अहमदनगर 9420639185.
stay connected