*रामतीर्थ आरोग्य मंदिरासाठी मा. सरपंच संदीप रामगुडे यांच्या वतीने आज दिवसभराचे अन्नदान*
आष्टी- रामतीर्थ आरोग्य मंदिरासाठी रोज मोफत अन्नदान सुरू असून रोज नवनवीन अन्नदाते समोर येत असतानाच आज आंबेवाडी येथील रहिवासी संदीप रामगुडे यांचे दिवसभराचे अन्नदान आहे.
संदीप रामगुडे यांनी सालेवडगांव-आंबेवाडी या ग्रा.प. चे ५ वर्ष सरपंच पद भोगले असून सध्या ते उत्तम शेती करत दूध धंद्यात ते आज पंचक्रोशीत नम्बर एक ला आहेत, आज रोजी त्यांच्याकडे 300 लिटर दुध आहे.
काय असेल ते तोंडावर बोलणारा हा राजा माणूस, कुणाला राग येईल किंवा काहीही होवो जे असेल ते तोंडावर बोलणारा हा माणूस, पंचक्रोशीत कोणत्याही हॉटेल वर जाऊन रोज १०-२० लोकांना स्वतः पदर चहा पाजत माणुसकी जपणारा हा माणूस, कुणाच्याही सुखात आणि दुःखात सर्वात पुढे असणारा आणि कुठेच एका जागेवर न थांबता सारख या गावावरून त्या गावाला फिरत राहणार म्हणून त्यांची ओळख. कोरोना काळात आपण केलेले अन्नदान नेहमी लक्षात राहील. देव करो नेहमी अरोग्यदायी रहा.
stay connected