भावी अधिकाऱ्यांसाठी लालपरी रस्त्यावर धावणार

 दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी एमपीएससी ची परीक्षा आहे.उद्या खास भावी अधिकाऱ्यांसाठी लालपरी रस्त्यावर धावणार आहे.                   


       विद्यार्थ्यांना   परीक्षेला जाणे  सोईस्कर व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग  परिवहन  महामंडळाच्या  करमाळा बसस्थानकावरून  करमाळा- सोलापूर या मार्गावर  बसेस सोडण्यात येतील. तसेच परतीच्या प्रवासासाठी देखील  बस विद्यार्थ्यांना उपलब्ध असतील. तरी ज्यांना रविवारी परीक्षेला जायचे आहे त्यांनी  वाहतूक नियंत्रण कक्ष (02182-220336) यांच्याशी संपर्क साधावा. विद्यार्थ्यांच्या मागणी नुसार सकाळी 6.00 व 6.30  सोलापूरला जाण्यासाठी  बसेस करमाळा बसस्थानकावरून करमाळा टेम्भुर्णी-सोलापूर या मार्गावरून सोडण्यात येतील. सोलापूर बसस्थानकावरून वरून संध्याकाळी  6.30 वाजता या बसेस करमाळा ला येण्यासाठी सोलापुर- टेम्भुर्णी- करमाळा या मार्गावरून येतील.बस मध्ये प्रवास करताना विद्यार्थ्यांनी मास्क  व सॅनिटाईजर चा वापर करावा. या सर्व बसेस निर्जंतुकिकरण करूनच प्रवाशांच्या सेवेसाठी वापरण्यात येतील. तरी, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जायचे आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.