*केज उपजिल्हा रग्णाल्यातील कर्मचाऱ्याचे पगार वेळेवर द्या अन्यथा काम बंद आंदोलन...*
केज / घाडगे रंजीत
महाभयंकर कोरोना काळात सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता जीवावर उधार होऊन देखील आपल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळत नसल्यामुळे उपजिल्हा रुग्णायलय केज येथील कर्मचाऱ्यांची पगार वेळेवर होत नसुन कधीही 20 तारखे नंतर किंवा पुढच्या महिण्यात केला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थीक कुचंबना व मानसीक त्रास होत आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी बँकेतुन घर कर्ज बांधणे, शैक्षणिक कर्ज, कार लोन घेतले आहे. अश्या लोकांचे बँक हप्ते वेळेवर जात नाही. त्यामुळे त्यांची बँकेतील पत कमी होत असुन त्यांच्यावर अतिरीक्त व्याज म्हणुन बँक त्यांच्याकडुन दंड वसुल करत आहे. व पुन्हा त्यांना कुठलीही बँक कर्ज पुरवठा करण्यास तयार होत नाही. काही कर्मचाऱ्याचे पाल्य बाहेर गावी शिकण्यासाठी असल्यामुळे त्यांना आर्थीक मदत करण्यास विलंब होतो. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. ज्या उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी आपले काम व आपले योगदान मनोभावे करतात. अश्या कर्मचाऱ्याची आर्थीक कुचंबना होत असेल तर आम्हाला काम बंद करण्याची वेळ येईल. यास उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिक्षक व कार्यालयीन कर्मचारी जवाबदार राहतील. साहेबांनी गांर्भीयाने विचार करावा नाही तर आम्हाला काम बंद आंदोलन करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. अश्या आशयाचे निवेदन मा. आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. मा. संचालक आरोग्य सेवक, मुंबई. मा. जिल्हा शल्य चिकित्सक, बीड. मा. वैद्यकिय अधिक्षक साहेब, उपजिल्हा रुग्णालय केज यांना कर्मचारी यांच्या वतीने देण्यात आले आहे.
stay connected