नगर येथे न्यूराॅन प्लस भव्य दिव्य नुतन हॉस्पिटलचे गृहमंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते होणार लोकार्पण हॉस्पिटल मध्ये अनुभव तज्ञ डॉ विधाते,डाॅ कासवा,डाॅ गाडेकर विविध शस्त्रक्रिया करणार

 नगर येथे न्यूराॅन प्लस भव्य दिव्य नुतन हॉस्पिटलचे गृहमंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते होणार लोकार्पण 


हॉस्पिटल मध्ये अनुभव तज्ञ डॉ विधाते,डाॅ कासवा,डाॅ गाडेकर विविध शस्त्रक्रिया करणार 



आष्टी। प्रतिनिधी 

नगर शहरामध्ये मेंदू मणका अपघात यामधील रुग्णांना सुविधा युक्त व अनुभवी असलेले डॉ.मुकुंद विधाते,डाॅ.अमोल कासवा,डाॅ.अविनाश गाडेकर यांनी भव्य दिव्य नुतन न्यूराॅन प्लस जनतेच्या सेवेत दि.२८ जानेवारी रोजी गृहमंत्री दिलीपजी वळसे यांच्या हस्ते उद्घाटन होऊन लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. 

अहमदनगर येथील सावेडी नाका परिसरात न्यूरॉन प्लस मेंदू मणका अपघात हाडांचा आजारावर अत्याधुनिक व परिणामकारक उपचार रुग्णांना वेळेत मिळण्यासाठी या हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली असून यामध्ये डाॅ.मुकुंद विधाते यांनी एमबीबीएस,एम.डी.डी.एम या पदव्त्रा पुणे,मुंबई,लखनौऊ,येथे घेतल्या असून जर्मनी येथे प्रशिशिक्षण घेतले आहे.मेंदू मणके,रक्तातील गुठुळ्या बिनटाका शस्त्रक्रिया करणारे ते नगर जिल्ह्यात एकमेव आहेत. ९ वर्षाचा अनुभव व ५ वर्षापासून नगरमध्ये सेवा देत आहेत.फिट येणे मान दुखी यावर विशेष उपचार करतात,डॉ.अमोल कासवा यांनी एमबीबीएस एम सी एच न्यूरोसर्जन चे शिक्षण घेतले अहमदनगर मध्ये गेल्या पंधरा वर्षे आपल्या नगरच्या मातीशी नाळ कायम राखत त्यांनी रुग्ण सेवा करण्याचे ठरवून चार वर्षापासून प्रॅक्टिस करत आहेत.परीक्षेत राज्यात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. नगर मध्ये त्यांनी जवळपास हजाराहून अधिक मेंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करीत रुग्णांना नवीन जीवन दिले आहे त्यांनी भूल न देता रुग्ण पूर्ण शुद्धीत असताना ब्रेन ट्यूमरचे शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्याची कामगिरी केलेली आहे. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया त्यांचा हातखंडा असल्याने अशा शेतकऱ्यांसाठी रुग्णांना मोठा महानगरात जाण्याची गरज नाही ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर अविनाश गाडेकर यांनी एमबीबीएस नंतर पदवीत्तर शिक्षण प्राप्त केले नाशिकचे सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन विजय कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्याचे नैपुण्य प्राप्त केले आहे.गेल्या ९ वर्षापासून नगर मध्ये आहे त्यांच्या अनुभवाचा रुग्णांना मोठा लाभ झाला आहे हाडांच्या आजारावर सर्व प्रकारच्या प्रक्रिया जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात त्यांचा हातखंडा आहे.या उद्घाटनसोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन डॉ.मुकुंद विधाते,डाॅ अमोल कासवा,डॉ अविनाश गाडेकर डॉ. पुनम विधाते,रामराव विधाते,सीताबाई विधाते, भानुदास पुंड, डॉ अमोल कासवा, डॉ पूजा कासवा,शैलजा कासवा,डॉ सुभावजी देवड,प्राजक्ता गाडेकर,लक्ष्मणराव गाडेकर,शकुंतला गाडेकर,सुभाष खंडाळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.