*महाराष्ट्रीयन लोकांनी मराठीतच बोलले पाहिजे - डॉ.दत्तात्रय फलके*

 *महाराष्ट्रीयन लोकांनी मराठीतच बोलले पाहिजे - डॉ.दत्तात्रय फलके*



आ.ता. शि.प्र. मंडळ संचलित ॲड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालय , आष्टी.

राष्ट्रीय सेवा योजना व मराठी साहित्य प्रतिष्ठान जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने  "मराठी असे आमुची मायबोली " या विषयावर मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने व्याख्यान आयोजित केले होते .

यावेळी डॉ. दत्तात्रय फलके म्हणाले की , मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हवा असेल तर जास्तीत जास्त मराठी भाषा बोलली पाहिजे , यासाठी मराठी माणसांनी प्रयत्न केले पाहिजेत.

मराठी भाषेला फार जुनी परंपरा आहे , संत ज्ञानेश्वर , संत एकनाथ , संत तुकारम , मुकुंदराज, जगन्मित्र नागा, यांनी मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केलेले आहे .

पूर्वीच्या लोकसाहित्यातील वासुदेव , पोतराज पिंगळा , बहुरूपी, यांनी देखील मराठीला , मराठी संस्कृतीला जीवदान देण्याचे काम केलेले आहे .

मुस्लिम मराठी साहित्याचे देखील  योगदान लाभलेले आहे .

तसेच महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही मराठी भाषेचा आग्रह धरलेला दिसून येतो.

मूल जन्माला आले की, ते भाषा अवगत करू लागते,

त्यामुळे मुलांना मराठी भाषा अवगत कशी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावयास हवे.

नुसते वाटणे आणि करणे यामध्ये फरक आहे प्रत्यक्ष कृती केली पाहिजे असे ते म्हणाले.

प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितले की, मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी माणसांची मानसिकता बदलणे महत्त्वाचे आहे .

या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन श्री. किशोर नाना हंबर्डे व श्री. अतुलशेठ मेहेर यांचे लाभले.

संयोजन प्रा.आ. य. पवार , प्रा. जयानुल्ला पठाण, डॉ.सुहास गोपणे, प्रा. आनंद देशमुखे , डॉ. रवी सातभाई , प्रा. स्वाती चौधरी, डॉ. रामकिसन पोकळे, प्रा.चंदन साबळे, यांनी केले होते . सूत्रसंचालन डॉ. राजाराम सोनटक्के यांनी तर आभार डॉ. विद्या काशीद यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.