कळवा पोलीस स्थानकात अत्याधुनिक व्यायाम शाळेचे उद्घाटन
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.२८ कळवा (ठाणे ) कोरोना काळात अत्यंत महत्वाची भूमिका बजाविनाऱ्या आणि सतत नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी कळवा पोलीस स्थानकात आज अत्याधुनिक व्यायाम शाळेचे उद्घाटन झाले.
आपले कर्तव्य बजावताना बहुतेक पोलीस स्वतःच्या आरोग्याची हवी तशी काळजी घेऊ शकत नाही.
कामाचा ताण आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना स्वतःच्या तब्बेतिकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही.
परंतु जर पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी जागा आणि साहित्य उपलब्ध झाले तर नक्कीच सर्वजण व्यायाम करतील आणि स्वतःला शारीरिक दृष्ट्या फिट ठेवतील.
याच संकल्पणेतुन गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या यांच्या मार्गदर्शनात कळवा पोलीस स्थानकात समाज सेवक मंदार केनी आणि अपोलो जीमचे संस्थापक कमलाकर पाटील यांच्या माध्यमातून अत्याधुनिक व्यायाम शाळेचे उद्घाटन करण्यात आले.
ठाणे पश्चिम प्रादेशिक पोलीस अप्पर आयुक्त अनिल कुंभारे यांच्या हस्ते या व्यायाम शाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे,कळवा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे,कळवा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड,अपोलो जिमचे संस्थापक कमलाकर पाटील,तसेच कळवा पोलीस स्थानकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
stay connected