जिल्हा परिषद शाळा गौरगांवमध्ये प्रजासत्ताक दिन संपन्न
( प्रतिनिधी तासगाव / सांगली )
सालाबादप्रमाणे जिल्हा परिषद शाळा गौरगांव मध्ये भारताचा राष्ट्रीय सण २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन शासनाच्या नियमाचे पालन करून साजरा करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वरिष्ठ मुख्याध्यापक सुधाकर बनसोडे, आदर्श शिक्षक नंदकुमार खराडे, बाळासाहेब पाटील, किरण नवले, रामचंद्र माळी, अरुणा खराडे, आशा रणखांबे, कवी लेखक नवनाथ रणखांबे इ.आणि शालेय विध्यार्थी यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.
stay connected