*बिटरगाव व चातारी येथे युवा जागर बैठकीचे आयोजन!*.

 *बिटरगाव व चातारी येथे युवा जागर बैठकीचे आयोजन!*. 




सुनील शिरपुरे/ झरीजामणी



बिटरगाव व चातारी येथे युवा जागर बैठकीचे आयोजन दिनांक 29 जानेवारी 2022 शनिवार रोजी सकाळी ठिक 10:00 वाजता भोईवाडा बिटरगाव तसेच दुपारी 02:00 वाजता भोईवाडा चातारी येथे महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ युवा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर बैठकीचे मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष भोई समाजाचे कैवारी नेते आदरणीय श्री.मारोतराव पडाळ, भोई समाज संघटक श्री.निरंजन सातघरे, जिल्हा सरचिटणीस श्री.महादेवरावजी वाघाडे, महिला संघटक सौ.सोनालीताई सातघरे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच डॉ. डी. एल. बावणे सर महागाव तालुकाध्यक्ष, संजय राखडे भोईराजे, श्रीराम बावणे, आकाश बावणे, मारोतराव नेमाडे, बंडूभाऊ शिवरकर, मंगेश बोरकर, शंकर भाऊ बोरकर, आदी समाज संघटकांची उपस्थिती राहणार असून जास्तीत जास्त समाज बांधवांनी युवा जागर बैठकीला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन बिटरगाव शाखेचे भोई समाज संघटक श्री.सुरेश सातेगावर, मारोतराव रावते, प्रवीण बावणे, तुळशीराम गोडाडे, गजानन पेवकर, गजानन बोरकर, संभाजी सातेगावर, गजानन बावणे,काशिनाथ सातेगावर, संजय सातेगावर, तसेच चातारी येथील युवा शाखेचे, श्री, भागाजी शिवरतवाड सर, नामदेव देवगडे, पिंटूभाऊ देवगडे, नारायण देवगडे, सुनील देवगडे, हनुमान देवगडे आदींनी केले आहे. तरी सर्व समाज बांधवांची उपस्थिती प्रार्थनिय आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.