*नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी जाहीर होणार*
———————————————
आष्टी-बीड जिल्ह्यातील पाच नगर पंचायतीसह राज्यातील 139 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठीच्या आरक्षणाची सोडत 27 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील 139 नगरपंचायतीच्या निवडणूका नुकत्याच पार पडलेल्या या निवडणुकांच्या निकालानंतर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण काय पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.नगर पंचायतीच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महिन्याभरात आरक्षण सोडत होऊन नगराध्यक्ष विराजमान करणे आवश्यक आहे.दरम्यान या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांच्या आरक्षणाची सोडतीची तारीख नगर विकास विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.ही आरक्षणाची सोडत गुरुवार 27 जानेवारी रोजी सायं.4 वा. मुंबई मंत्रालय प्रधान सचिव यांच्या कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे.
ही सोडत झाल्यानंतर आष्टी नगर पंचायतच्या नगराध्यक्षपदी कोणाची निवड होती याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
stay connected