*फडणवीस यांच्या वक्तव्याचे करमाळ्यात बहुजन संघटनांनकडून निषेध*
करमाळा दि. २८( प्रतिनिधी राजु सय्यद )
मालाडच्या मालवणी परिसरातील क्रीडा संकुलला शहीद हजरत टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले असून त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध करत टिपू सुलतान यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपहार्य वक्तव्याचा करमाळ्यातील विविध समविचारी बहुजन संघटनांनी निषेध करत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार करमाळा यांच्या मार्फत निवेदन पाठविले आहे.
यावेळी सदरचे निवेदन नायब तहसीलदार सुभाष बदे यांनी स्वीकारले.
सदर निवेदन मध्ये म्हटले आहे कि, टिपू सुलतान यांनी कधीही धर्माचे आधारे कोणावरही अन्याय अत्याचार केलेला नाही. शेकडो मंदिरांसाठी त्यांनी जमीन, सोने दान दिले आहे. भारताला गुलाम करणाऱ्या इंग्रजाविरोधात लढताना ते शहीद झाले. अशा महान महापुरुषाचे नाव क्रीडा संकुलला देऊन महाराष्ट्र सरकार त्यांचा सन्मान करत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोटा व चुकीचा इतिहास सांगून जाणीवपूर्वक सामाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून टिपू सुलतान यांच्याबद्दल आक्षेपहार्य वक्तव्य करून सर्व भारतीयांच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. तरी त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली असून मालाडच्या मालवणी परिसरातील क्रीडा संकुलला शहीद टिपू सुलतान यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी दिनेश दळवी, भीमराव कांबळे, विनोद हरिहर, अमोल कांबळे, दिनेश माने, गौतम खरात, आझाद शेख, कय्युम शेख, अमर शेख, अझहर शेख, सुफ्रान शेख, युसुफ शेख, जावेद पठाण, सादिक शेख, सादिक तांबोळी, जावेद मणेरी, मुस्तकीम पठाण, इरफान सय्यद, सादिक कुरेशी यांच्यासह बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, शहीद हजरत टिपू सुलतान सामजिक बहुउदेशिय संस्था, बुधिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, राष्ट्रीय घुमन्तु जनजाती मोर्चा आदी संघटनांचे पदाधिकार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
stay connected