केजमध्ये शेकापचे माजी मंत्री भाई एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली
केज / प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सहकार मंत्री भाई डॉ. एन. डी. पाटील यांचे मागील काही दिवसांपूर्वी निधन झाले. केज शहरात शेकापच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
भाई डॉ. एन. डी. पाटील यांनी आपले आयुष्य शोषित, शेतकरी, कष्टकरी समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. शेतकरी कामगार पक्षाचा डावा विचार शेवटच्या श्वासापर्यंत तेवत ठेवला होता. त्यांनी कापुस एक अधिकार योजनेला जन्म दिला. शेतकऱ्याला २४ तासाच्या आत कापसाचे पेमेंट नाही गेले तर व्याजासगट पैसे देणारे भारताला पहिला सहकार मंत्री ठरले आहेत. रोजगार हमी योजना लागु करा या मागणीसाठी इस्लामपूर वैराग येथे शेकापचे आंदोलन झाले होते. त्यात त्यांच्या पायाला गोळी लागली होती. तर त्यांच्या पुतण्यासह ६ कार्यकर्ते शहीद झाले होते. त्यानंतर रोजगार हमी योजना देशभर लागू झाली होती. याशिवाय एससीझेडचा लढा लढून त्यांनी शेतकर्यांना न्याय मिळवून दिला होता. त्यांनी अविष्यभर शेकापचा लाल झेंडा घेऊन काम केले अशी भावना शेकापचे भाई मोहन गुंड यांनी व्यक्त केली. तर अंधश्रध्दा निर्मूलन समितीमध्ये एन. डी. पाटील यांचे खुप मोठे योगदान राहिले असून एन. डी. यांच्या जाण्याने राज्यातील पुरोगामी चळवळ पोरकी झाली अशी भावना हनुमंत भोसले यांनी व्यक्त केली. यावेळी भाई अशोक रोडे, शिवाजी ठोंबरे रजाक शेख मस्के सर, निखिल बचुटे, दादा दांगट, प्रमोद पवार, प्रविण गाढवे हे उपस्थित होते.
stay connected