जननायक स्व.कर्पुरी ठाकूर यांना भारत रत्न द्या...
राष्ट्रीय जनसेवा पक्षाची मागणी.
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.२४ अंबरनाथ (ठाणे) : बिहार राज्याचे पूर्व मुख्यमंत्री,थोर स्वातंत्र्य सेनानी,जननायक स्व. कर्पूरी ठाकूर यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी अभिनव भारत जनसेवा पक्षाने केली आहे.
स्व. कर्पुरी ठाकूर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष महावीर गाडेकर बोलत होते.
नाभिक समाजातील जन्मलेले कर्पुरी ठाकूर यांचे स्वातंत्र् काळातील योगदान,त्यांनी भोगलेला तुरुंगवास आणि बिहारचे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल म्हणून भारत सरकारने त्यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी जनसेवा पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
गाडेकर पुढे असेही म्हणाले की,
दलित वंचित समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे महान कार्य कर्पुरी ठाकूर यांनी केल्यामुळे बिहारमधील जनतेने त्यांना जननायक ही उपाधी दिली होती.
गरीब कुटुंबात जन्म होऊन आणि
त्याकाळातील सभोवतालच्या कठीण परिस्थितीवर यशस्वी मात करून कर्पुरी ठाकूर यांनी जे यशाचे शिखर गाठले, त्यांचे हे अलॉकिक कार्य नव तरूनाना आणि राजकारण्यांना नक्कीच प्रेरणादायी आणि नवचेतना निर्माण करणारे आहे.
अशा या भारतमातेच्या थोर सुपुत्राचा सन्मानाने गौरव होऊन त्यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी पक्षाध्यक्ष गाडेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.
stay connected