_|| ज्योती क्रांती - कडा शाखाचा उपक्रम ||_
*हळदी-कुंकू आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.*
---------------
कडा (प्रतिनिधी ) अनिल मोरे - ज्योती क्रांती को-ऑप क्रेडिट सोसा.लि.कडा शाखेच्या च्या वतीने आयोजित हळदी-कुंकू आणि तिळगुळ वाटप सोहळा उत्साहात संपन्न झाला. कडा शहरातील विविध क्षेत्रातील महिलांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.ज्योती क्रांतीच्या माध्यमातुन महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न हे स्तुत्य असुन महिलांना प्रोत्साहन मिळणे हेतु ज्योती क्रांती सदैव महिला उपक्रमांचे आयोजन करत असते,अशी प्रतिक्रिया उपस्थित महिलांनी याप्रसंगी व्यक्त केली. ज्योती क्रांती शाखेचे शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांनी याप्रसंगी विविध योजनांची माहिती देऊन महिलांना आर्थिक बचतीबाबत मार्गदर्शन केले.या प्रसंगी महिलांना तिळगुळ आणि संसार उपयोगी वस्तू भेट देण्यात आली.
*-ज्योती क्रांती परिवार,महाराष्ट्र राज्य.*
914 6014 914
stay connected