*माजीमंत्री राजेंद्र दर्डा यांना भावले "ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.."!*

 *माजीमंत्री राजेंद्र दर्डा यांना भावले "ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.."!*

प्रकाशनपूर्व पहिली प्रत व व्यक्तिचित्रांचे कौतुक.




औरंगाबाद,दि.- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवा निमित्ताने ज्येष्ठ संपादक व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष राजा माने लिखित "ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.." या पुस्तकाची प्रकाशनपूर्व पहिली प्रत आणि ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिचित्राची आकर्षक फ्रेम लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ व माजीमंत्री राजेंद्र दर्डा यांना भेट देण्यात आली.

लोकमत भवन येथे पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात मुंबईत होणाऱ्या नियोजित पुस्तक प्रकाशन व्यक्तिचित्र प्रदर्शन समारंभाचे संयोजक बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे व सहसचिव मुरलीधर चव्हाण तसेच. प्रिंटवेल इंटरनॅशनलचे संचालक सागर प्रदीप शिंदे यांच्या हस्ते ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेल्या राजेंद्र दर्डा यांच्या व्यक्तिचित्राची आकर्षक फ्रेम दर्डा यांना भेट देवून सत्कार करण्यात आला.लेखक राजा माने यांनी अंतिम छपाई झालेल्या पुस्तकाची पहिली प्रत त्यांना प्रदान करुन आशीर्वाद घेतले.

*राजेंद्र दर्डा यांनी "ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.." पुस्तकातील चित्रकार नितीन खिलारे यांच्या व्यक्तिचित्र रेखटनाचे तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या छपाई बद्दल प्रिंटवेल इंटरनॅशनलचे संचालक प्रदीप शिंदे, दिलीप शिंदे, श्रीमती सुनिता कुलकर्णी,सागर शिंदे व टीमचे अभिनंदन केले.राजा माने यांचे या उपक्रमाचे कौतुक केले.पुस्तकाला श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची प्रस्तावना तर पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांचे मलपृष्ठ मनोगत. लाभले आहे.* आपल्या कर्तृत्वाने आभाळ कवेत घेतलेल्या विविध क्षेत्रातील ७५ व्यक्तिमत्त्वांच्या गुणांवर राजा माने यांच्या लेखणीतून प्रकाश टाकण्यात आला आहे.या कार्यक्रमास लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील, चक्रधर दळवी,प्रेमदास राठोड ,खुशालचंद बाहेती उपस्थित होते.लोकमतचे प्रेसिडेंट ओमप्रकाश केला,व्हाईस प्रेसिडेंट बालाजी मुळे, शैलेश चांदीवाल, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर योगेश पाटील,सूरज दाहे यांनी माने यांना शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.