महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची महिलांसाठी मोठी घोषणा....
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.२५ मुंबई : 'आरे ला कारे' म्हणण्याची ताकद महिलांमध्ये असली पाहिजे, महिलांवरील अत्याचार खालच्या वर्गातच होत नाहीत तर चांगल्या घरातही होत आहेत. जी विशाखा समितीची स्थापन केली असली त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी खंत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. त्याचवेळी महिलांसाठी नवा टोल फ्री क्रमांकाची घोषणा केली. 155209 या टोल फ्री क्रमांकावरुन महिलांना तक्रार करता येईल, मदत मिळू शकेल, असे त्या म्हणाल्या.
राज्य महिला आयोगाचा 29 वा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, खासदार सुप्रिया सुळे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे उपस्थित होते. येत्या ७ ते ८ दिवसात या टोल फ्री क्रमांक कार्यरत होईल. महिला धोरणाची अंमलबजावणीवर मी भर देत आहे. २५ किलोमीटर टॉयलेट हवे, असा नियम आहे. कर्नाटक तसे आहेत, पण महाराष्ट्रात नाही. त्याची अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे, त्याकडे महिला आयोगाने लक्ष दिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
यात महाराष्ट्र पहिले राज्य - यशोमती ठाकूर
महिला धोरणाला आपण महत्त्व देत नाही, पण ते अतिशय महत्त्वाचे आहे. मंत्रीमंडळात मी भांडते. का भांडू नये, एक कोस्टल रोड झाला नाही तर... पण एकल महिला, अनाथ मुलांना पैसे मिळालेच पाहिजेत. महिला आयोग, बालकल्याण आयोगाला पैसे दिले नाहीत तर आपण राज्य कशासाठी चालवतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता निर्णय झाला आहे. जिल्हा नियोजन समितीचा ३ टक्के निधी महिला व बालकल्याणासाठी मिळेल. हा निर्णय करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे, असे मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.
लग्नाचे वय १८ वरुन २१ करण्यात काय हाशील - सुप्रिया सुळे
लग्नाच्या वयाच्याबाबत केंद्रात निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या विषयावर महाराष्ट्रातही चर्चा व्हायला हवी. केंद्र सरकारला आम्ही विनंती केलीय की घाईघाईनं निर्णय घेऊ नये. अनेकांकडून प्रश्न आले की १८ वय २१ करण्यात काय हाशील आहे, त्यामुळे महाराष्ट्रात चर्चा जरुर व्हावी. केंद्राकडे आपली मतं मांडता येईल, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
डिपीडीसीचा अनेक वर्षांचा प्रलंबीत प्रश्न महाविकास आघाडीनं सोडवला आहे. महिला धोरण आलं त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही महत्वाची भूमिका होती. इतर पक्षांच्या महिलांनाही या कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं. आज या कार्यक्रमाला सर्वच पक्षांच्या महिला प्रतिनीधींनी असायला हवं होतं. काही गोष्टीत राजकारण बाजूला ठेवून करायच्या असतात,असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
stay connected