*अंगी असलेल्या अभिनेत्याला आव्हान देण्यासाठी 'ऍक्ट प्लॅनेट एक्टिंग अकॅडमी' आणि 'चार्ली स्टुडिओ' सज्ज* *'ऍक्ट प्लॅनेट एक्टिंग अकॅडमी' आणि 'चार्ली स्टुडिओ'च्या व्यासपीठामुळे मिळणार गरजवंतांना संधी*

 *अंगी असलेल्या अभिनेत्याला आव्हान देण्यासाठी 'ऍक्ट प्लॅनेट एक्टिंग अकॅडमी' आणि 'चार्ली स्टुडिओ' सज्ज*


*'ऍक्ट प्लॅनेट एक्टिंग अकॅडमी' आणि 'चार्ली स्टुडिओ'च्या व्यासपीठामुळे मिळणार गरजवंतांना संधी*









आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ चे आध्यक्ष मेघराज भोसले यांच्या हस्ते उदघाट्न रेबीन कापून प्रीतम पाटील यांचे स्टार आभिनेत्री आसु सुरपुर यांनी अभिनंदन केले 

प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे 

पुणे अभिनय क्षेत्रात उतरायचं असेल तर आपला कोणीतरी गॉड फादर हवा हे समीकरण कुठेतरी संपुष्टात येऊ लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.स्थानिक कलाकारांना वेगवेगळ्या व्यासपीठांद्वारे मिळालेल्या संधीचे सोने करणे हे त्यांच्या हातात आहे.अशी काही व्यासपीठ कलाकार मंडळींना हक्काची जागा मिळवून देऊन त्यांच्या यशाचा भाग होतात.अशाच मंडळींना यशाच्या शिखरावर पोहोचवण्यास 'ऍक्ट प्लॅनेट एक्टिंग अकॅडमी' आणि 'चार्ली स्टुडिओ' हे अकॅडमी आणि स्टुडिओ घेऊन येण्यास सज्ज झाला आहे.महाराष्ट्रातील तमाम स्थानिक कलाकारांना एक संधी मिळावी याकरीता ही अकॅडमी आणि स्टुडिओ त्यांच्यातील कलागुणांना उत्तम व्यासपीठ मिळवून देण्यास तयार झाले आहे.या अकॅडमी आणि स्टुडिओद्वारे महाराष्ट्रातील मीडियापर्सनला व्यवहारिक शिक्षण घेता येणार आहे.येथे डबिंग,व्हिएफएक्स,क्रोम,एडिटिंग,फोटोग्राफी याचे धडे देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना याचे व्यवहारिक ज्ञान घेता येणार आहे.या अकॅडमी आणि स्टुडिओची विशेष बाब म्हणजे कमीत कमी शुल्क आकारून गावा-खेड्यांतील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणे होय.ज्यांना मनापासून मीडिया इंडस्ट्रीमध्ये उतरण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी या व्यासपीठाचे दरवाजे कायम उघडे आहेत.'ऍक्ट प्लॅनेट एक्टिंग अकॅडमी' बद्दल बोलायचे तर या अकॅडमीने आजवर अनेक उत्कृष्ट कलाकार घडवले.कलाकारच नव्हेतर चित्रपटांची निर्मिती करून या कलाकारांना मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी देखील दिली.ही अकॅडमी टेक्निकली ऍडव्हान्स असून महाराष्ट्रातील पहिली टेक्निकली ऍडव्हान्स अकॅडमी म्हणून सर्वत्र ज्ञात आहे.रमेश खाडे आणि अभिनेते,लेखक,दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील यांनी या अकॅडमी आणि स्टुडिओच्या जबाबदारीची धुरा पेलवली आहे.दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील यांनी 'खिचिक','डॉक्टर डॉक्टर' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, याशिवाय त्यांचे 'जिऊ','ढिशक्याव' हे चित्रपटही प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.या अॅकॅडमीकरीता मिडीया हेडची जबाबदारी राजू पाटील सांभाळत आहेत.तर 'फ्रेशमिंट मीडिया' कंपनी या अकॅडमीचा जनसंपर्क भार सांभाळत आहे.तसेचं या अॅकॅडमीचे व्यवस्थापनाचा कार्यभार कार्यकारी निर्माते संतोष खरात,स्वानंद देव,विष्णू घोरपडे हे सांभाळत आहेत.सदर अॅकॅडमीचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे उप अध्यक्ष संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले स्टार आभिनेत्री आसु सुरपुर पुणे अभिनेता सुहास वैद्य मराठी,हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.यावेळी बोलताना मेघराज राजेभोसले म्हणाले की,प्रत्येकाच्या अंगी दडलेल्या अभिनेत्याला आव्हान देण्यासाठी ''ऍक्ट प्लॅनेट एक्टिंग अकॅडमी' आणि 'चार्ली स्टुडिओ' तर्फे अकॅडमी आणि स्टुडिओचे व्यासपीठ सज्ज झाले आहे.नजरअंदाज न करता दिग्गज आणि अनुभवी व्यक्तींकडून मिळणारे अनुभव आणि धडे घेण्यासाठी तत्पर रहावे.आणि या संधीचा फायदा घ्यावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.