*सुंबेवाडी येथे आय सी आय सी आय फाऊंडेशन'तर्फे मुरघास बॅग व गांडूळ बेड वाटप*
- आय.सी. आय. सी. आय. फाउंडेशन हे आष्टी तालुक्यामध्ये पंधरा गावांमध्ये काम करत आहे त्यामध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण शेती दुग्ध व्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन तसेच उद्योग अभिमुख प्रशिक्षण शेतकरी व महिला वर्गाला देण्याचे काम करते त्या माध्यमातून सुंबेवाडी गावामध्ये पाच दिवसाचे दूध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले होते त्यामध्ये दुधाळ जनावरांचे संगोपन आजार व त्यावरील उपचार घरगुती खुराक बनवण्याच्या पद्धती मुक्त गोठा पद्धत अझोला व मुरघास बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले व आय.सी. आय. सी.आय. फाउंडेशन यांच्यामार्फत गांडूळ बेड व मुरघास बॅग शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमा साठी आयसीआय सी आय फाउंडेशन चे डीओ चेतन पाटोळे सर, सी. एफ बाळू कांबळे सर,यशवंत बहिरम सर सुंबेवाडी चे सरपंच योगेश शेळके,उपसरपंच अशोक गागरे,ग्रा.स.सुभाष वाळके, अनिल शेळके, युवराज शेंडगे,सुंबेवाडी ग्रामस्थ व तरूण वर्ग उपस्थित होते.
stay connected