*सरळ संयमी स्वाभाविक महेबुबभाई यांचा नगरपंचायत निवडणूकी वरून बळी जात असेल तर खपऊन घेतले जाणार नाही* *शेख कासम*
दौलावडगाव / प्रतिनिधी....
नुकत्याच काही दिवसापूर्वी नगरपंचायत बीड 2021-22 निवडणूक झाल्या यामध्ये राष्टवादी काँग्रेस पक्षाला बर्याच ठिकाणी जनतेने सत्तेपासुन दूर ठेवले काही दिगज नेत्यांना नामुश्कीला सामोरे जावे लागले परंतु यामध्ये राष्टवादी काँग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष महेबूबभाई यांचे नाव प्रसिद्धी माध्यमातून जास्तच चर्चेत आहे.
अडचणीच्या काळात राज्यात सत्ता नसतांना राज्य सरकारच्या विरोधात विविध अंदोलने केली. विधानसभा स्टार प्रचारक म्हणून महेबूबभाई यांनी महाराष्ट्रभर प्रचारकरून युवकांचे मने जिंकली व पक्षाला मोठी ताकद दिली.आणि आत्ता नगरपंचायत चे कारण दाखवून जर महेबूबभाईचा बळी जात असेल तर येणाऱ्या काळात आष्टी विधानसभा मतदार संघात राष्टवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम करून पक्षात बरीच पोकळी निर्माण करू असे मत टिपू सुलतान युवा मंचचे आष्टी तालुका उपाध्यक्ष कासम शेख यांनी व्यक्त केले.
stay connected