सय्यद शौकत धानोरा प्रतिनिधी -
12 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या इ.8 वी स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून साहिल राजु शेख रा. गहूखेल ता. आष्टी जि. बीड याने अहमदनगर जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून यश संपादन केले . 2002 गुण मिळवून इंग्रजी माध्यमातून पाथर्डी तालुक्यातुन त्याने प्रथम क्रमांक मिळवला तर जिल्ह्यात तो पाचवा आला आहे.त्याला यासाठी पाथर्डीचे श्री. बंडू गाडेकर सर आणि आष्टीचे मल्हारी गर्जे सर यांचे मार्गदर्शन लाभले. सावित्रीबाई फुले शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास संस्था फुलेनगर पाथर्डी चे सचिव श्री. जगन्नाथ सानप आणि अध्यक्षा सौं. लता सानप यांनी साहिल ला आशीर्वाद देऊन त्याला शुभेच्छा दिल्या तसेच केंद्रप्रमुख अलका बडे यांनी अभिनंदन केले. माणिकदौंडी सारख्या ग्रामीण भागातून त्याने ही परीक्षा देऊन यशस्वी झाल्याने परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
stay connected