प्रा. साईनाथ शिवाजी मोहळकर सेट परीक्षा उत्तीर्ण

 प्रा. साईनाथ शिवाजी मोहळकर  सेट परीक्षा उत्तीर्ण



आष्टी प्रतिनिधी


आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित अन्नतंत्र महाविद्यालय, आष्टी येथील प्राध्यापक व प्रभारी प्राचार्य साईनाथ मोहळकर यांनी माहे सप्टेंबर 2021 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) नवी दिल्ली व सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ग्रह विज्ञान (Home Science) या विषयात (SET) सेट परीक्षा उत्तीर्ण झाले असून सदरील परीक्षा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्हता  मानली जाते. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे, युवानेते व संचालक डॉ. अजय दादा धोंडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. डी.बी. राऊत,प्रा. एस. जी.विधाते, श्री डी. एम. गिलचे , माऊली बोडखे,संजय शेंडे व  महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.