आष्टी (प्रतिनिधी)
वातावरणातील बदलामुळे सध्या एकही घर असं नाही की जिथे आजारी माणूस नाही.गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रत्येक घरात किमान एक माणूस आजारी आहे.सर्दी,ताप,खोकला, अंगदुखी यापैकी एकतरी लक्षण कोणाला न कोणाला दिसून येत आहेत.शिवाय कोवीडचा प्रादूर्भाव अजूनही कमी होत नसल्याने दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच आपण आपला वाढदिवस साजरा करणं हे मला मान्य नसल्याचे सांगत एक वर्ष वाढदिवस केला नाही तर त्याने फार मोठा फरक पडतो असे मला काही वाटत नाही त्यामुळे यंदा सर्वांना हातजोडून विनंती करुन यावर्षीचा माझा वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन आ.सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून केले आहे.
दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी आ.सुरेश धस यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो.कार्यकर्ते एक सण म्हणून हा दिवस संपूर्ण आष्टी पाटोदा शिरुर कासार मतदारसंघात तसेच बीड लातूर उस्मानाबाद प्राधिकारी मतदारसंघात साजरा करतात. माञ यावर्षी कोवीडचा वाढता प्रादूर्भाव तसेच साथीच्या रोगाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन आरोग्य विभागाने काही नियमावली आखून दिलेली आहे. जेणेकरुन रुग्ण संख्या रोखण्यासाठी प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करणे हि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.अशातच मी माझा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करणे मला मान्य नाही याच पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांनी यंदा माझ्या वाढदिवसानिमित्त कुठलेही कार्यक्रम घेऊ नयेत तसेच मला भेटायलाही येऊ नये ज्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यांनी मला फोन वरुन तसेच टेक्स्ट मॕसेज करुन देण्याचे आवाहन आ.सुरेश धस यांनी केले आहे.
stay connected