खाकी वर्दीतील देव माणूस

 खाकी वर्दीतील देव माणूस

--------------------------------


आज रविवार दि. 23 रोजी आष्टी येथे दोन दिवसांपासून एक वृद्ध व भोळसर महीला चिखली फाटा येथे आढळुन आली होती, ती महीला कुठली आहे हे देखील माहित नव्हते व त्या महीलेला मराठी नीट बोलता येत नव्हते सदरील महीला दोन.तीन दिवसांपासून आष्टी पोलीस स्टेशन येथे होती व पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस व पोलीस कॉन्स्टेबल स्वाती मुंडे पोलीस कॉन्स्टेबल दराडे व आष्टी पोलीस स्टेशनच्या सर्व टीमने ती महिला कोणत्या गावची आहे तो तपास करून सदरील महिलेच्या नातेवाईकांना संपर्क करून नातेवाईकांच्या ताब्यामध्ये दिली. या महिलेचे नाव हौसाबाई विष्णू जाधव हे असून या महिलेला आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांनी खाकी वर्दीतील देव माणूस या म्हणीप्रमाणे या महिलेला साडी चोळी देऊन नातेवाईकांना व त्या महिलेला जाण्याची खर्ची देऊन रवानगी केली यावेळी पोलीस निरीक्षक चाऊस साहेब स्वाती मुंडे, दराडे साहेब बहिरवाल मॅडम,सोनवणे मॅडम राठोड साहेब,धनवडे साहेब, पोलीस मित्र आनंद देवा जोशी व माऊली पोकळे.आदी उपस्थित होते.


प्रतिनिधी ज्ञानेश्वर पोकळे आष्टी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.