नवी मुंबई महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम
एनएमएमटीच्या बसमधे आता वाचनालयाची सुविधा....?
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.२४ ठाणे : नवी मुंबई महानगरपालिका नियमितपणे नवनवीन उपक्रम करण्यात इतर महानगरपालिकांपेक्षा पुढे आहे. महापालिकेने आता एनएमएमटीच्या परिवहन उपक्रमाच्या लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आत-बस लायब्ररी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात 3 लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एनएमएमटीच्या लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे. अशी सेवा सुरू करणारी नवी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.
एनएमएमटीच्या २६ व्या स्थापना दिनानिमित्त, लेट्स रिड इंडिया फाऊंडेशनच्या माध्यमातून महापालिकेने एनएमएमटी बस-मुव्हिंग लायब्ररी सुरू केली. पहिल्या टप्प्यात नवी मुंबई ते मुंबईतील मंत्रालयापर्यंत धावणाऱ्या एनएमएमटी बसमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते झाले. यावेळी महानगरपालिकेचे परिवहन प्रशासक योगेश कडूसकर, शहर अभियंता संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, लेट्स रिड इंडिया फाऊंडेशनचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
stay connected