फोटोग्राफर बंधूंच्या भावना दुखावणाऱ्या वार्ताहराचा निषेध करत तहसिलदार यांना निवेदन
आष्टी (प्रतिनिधी) दै.पार्श्वभूमी या वर्तमानपत्रामध्ये रोखठोक या सदरामध्ये दिनकर शिंदे या गेवराई येथील वार्ताहराने लग्न सोहळा ताब्यात घेऊ पाहणाऱ्या फोटोग्राफरला आवरा या मथळ्याखाली लेख लिहिला.यामध्ये आम्हा समस्त फोटोग्राफी व्यवसायिक बंधूंचा अवमान करण्यात आला आहे.वास्तविक पाहता प्रत्येक व्यवसायात व्यक्तिसापेक्ष असतो कोणी कसे वागावे कोणी कसे स्किल दाखवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे याच पार्श्वभूमीवर आष्टी तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने निषेध व्यक्त करीत आष्टी तहसिलदार यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, विवाह सोहळ्यासाठी कोणत्या फोटोग्राफरला बोलवावे हे दिनकर शिंदे कसे ठरवणार.दिनकर शिंदे यांना एखाद्या लग्नसमारंभात आलेला अनुभव सर्वांनाच कसं काय येऊ शकतो,दिनकर शिंदे यांचे यापूर्वीचे समाज सुधारणे विषयक एखादे कार्य उल्लेखनीय आहे काय? किंवा ते नुसतेच अनाहूत सल्ले देत आहेत याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे सर्व फोटोग्राफर चुकीचे वागतात असे असेल तर सर्वच वार्ताहर चांगले आहेत काय? असा प्रश्न निर्माण होतो शिंदे साहेब तुम्हाला एखाद्या लग्नसमारंभात एखाद्या फोटोग्राफरने इकडे बसा बाजूला सरका असे म्हणून तुमची जागा दाखवून दिली असेल तर आम्हा सर्व फोटोग्राफर व्यावसायिकांचा काय दोष आहे या प्रस्तुत लेखामध्ये आपला वैचारिक गोंधळ झालेला आहे तुम्ही इतर बाबी अतिशय सुंदर शब्दात मांडून फोटोग्राफर यांचे महत्त्व विशद केलेले आहे आणि कौतुकही केलेले आहे परंतु यापुढे फोटोग्राफरलाच नातेवाईक म्हणून गुलामगिरी स्वीकारणार का? असे म्हणणे तर्कसंगत कसे होऊ शकते यापुढे आपण आपले बुद्धिकौशल्य चांगल्या गोष्टींसाठी वापरावे अशी सद्बुद्धी आपणास प्राप्त होवो ही सदिच्छा देत आष्टी तालुका फोटोग्राफर असोसिएशनने दिनकर शिंदे यांचा निषेध व्यक्त करीत आष्टी तहसिलदार यांना निवेदन दिले आहे.यावेळी सर्व फोटोग्राफर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected