*राज्यस्तरीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत परळी च्या खेळाडूंचे यश*
*बीड:* रोलर रिले स्केटींग असोसिएशन औरंगाबाद व रोलर रिले स्केटींग असोसिएशन महाराष्ट्र याच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.30 जानेवारी रोजी 39 व्या राज्य स्तरीय रोल रिले स्केटींग स्पर्धा औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत परळी येथील खेळाडूंनी आपापल्या वयोगटात सहभागी होऊन आठ मेडल्स मिळवून यशस्वी कामगिरी केली. यामध्ये 6 ते 8 वयोगटातील 100 मीटर रेस प्रकारात राजदीप कोमटवार याने ब्रांझ मेडल, 10 ते 12 गटात नमन अवस्थी ब्रांझ, 12 ते 14 वयोगटात पंकज मुंडे -सुवर्ण पदक, विश्वास काळे, मकरंद मुंडे- ब्रांझ मेडल. तर 400 मीटर रिले मध्ये राजदीप कोमटवार सुवर्ण पदक व पंकज मुंडे याने सिल्वर मेडल्स मिळवून यशस्वी कामगिरी केली. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक विनोद दादेवाड यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन साईज स्केटींग संघटनेचे अध्यक्ष बाबा मुंडे, उपाध्यक्ष अनिल सानप,चेतन रणदिवे, प्रविण कोमटवार, डाॅ.वाल्मिक मुंडे, केशव कुकडे,अशोक पाटील, सुरेश मोरे सर,टोमणे सर,महाराष्ट्र विज तांत्रिक कामगार संघटनेचे अध्यक्ष डी.एन.देवकते,सचिव धर्मराज म्हस्के अक्षय कोपले यांनी अभिनंदन केले आहे व तिरूपती येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
stay connected