रेशन माफियांवर कारवाई साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
शेवगाव प्रतिनिधी ( प्रविण भिसे ) -
प्रविण भिसे शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव च्या तत्कालीन तहसीलदार सध्या अन्नधान्य वितरण अधिकारी अहमदनगर या ठिकाणी कार्यरत असलेल्या अर्चना पागिरे/भाकड यांना शासकीय सेवेतून त्वरित निलंबित करून पागिरे व भाकड कुटुंबियांच्या ईडी मार्फत चौकशी करण्यात येऊन दोषींवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी तसेच शेवगाव तहसील कार्यालयातील संतोष गर्जे यांची त्वरित जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी शासकीय धान्य काळाबाजार करणाऱ्या रेशन माफियांची पूर्ण कुटुंबाची ईडी मार्फत चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी व सर्व धान्य दुकानदाराकडून पॉस मशीनची बिल देण्यास सक्ती करण्यात यावी या सर्व विषयाविषयी मी श्री हरिभाऊ दादा काळे राहणार वडुले बुद्रुक तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली आहेत शेवगाव च्या तत्कालीन तहसीलदार अर्चना पागिरे भाकड अहमदनगर येथे कार्यरत आहे तरी शेवगाव मध्ये मुरूम वीटभट्टी साठी माती उत्खनन वाळू विक्री हे सर्व रॉयल्टी न देता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडवला त्याचप्रमाणे रेशन माफियांशी संगनमत करून करोडो रुपयांच्या रेशन मालाचा काळाबाजार व संतोष गर्जे हे कर्मचारी जनतेकडून वसुली होण्याच्या त्रासाबाबत मी दिनांक 31/1/2022 पासून आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार आहे या काळात माझे काही बरेवाईट झाले तर त्यास पुर्ण शासन जबाबदार राहील व याबाबत माझ्याकडे काही ठोस पुरावे आहेत असे हरिदादा काळे यांनी सांगितले
stay connected