दिल्लीत यंदाच्या महाराष्ट्र रथावर अवतरली अवघी "जंगलातील दुनिया"
राजधानी नवी दिल्लीत राजपथावर आज भारतीय संस्कृती आणि सामर्थ्याचा अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळाला आहे. अनेक राज्यांनी आपआपल्या राज्यातील सांस्कृतिक गोष्टींचं प्रदर्शन घडवलं. अनेक चित्ररथातून त्या त्या राज्यातील विविधता देशावासियांना पाहायाला मिळाली. महाराष्ट्राच्या चित्ररथावर यंदा जैववैविध्यता दाखवण्यात आली होती. महाराष्ट्रातील चित्ररथावर अनेक प्राणी, पक्षी, फुले, फळे, झाडे आणि जंगली श्वापदे आदी या चित्ररथावर दाखवण्यात आले आहेत. जणू काही संपूर्ण सृष्टीच या चित्ररथावर अवरली की काय असा भास बघणाऱ्यांना होत होता. या चित्ररथावरील राज्य प्राणी शेकरू आणि राज्य पक्षी हरियालही सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. राज्याची जैववैविध्यता आणि त्याची माहिती देणारा महानायक अमिताभ बच्चन यांचा धीर गंभीर आवाज यामुळे या चित्ररथावर सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या होत्या.
महाराष्ट्र सरकारने यंदा ‘महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित हा चित्ररथ तयार केला होता. या देखण्या चित्ररथाच्या अग्रभागी कास पठाराला स्थान देण्यात आलं होतं. यावर फळांचा राजा आंबा, राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल, राष्ट्रीय पक्षी मोर, फुलपाखरू इत्यादींच्या प्रतिकृती लावण्यात आल्या होत्या. खार, सरडा झाड, वाघ आणि महाकाय फुलपाखरू धातूपासून बनविण्यात आले होते. झाडे लावू झाडे जगवू हाच आमचा धर्म खरा, असा संदेश महाराष्ट्राने दिला. जणू काही संपूर्ण जंगल की दुनियाच या चित्ररथावर अवतरल्याचा भास होत होता.
stay connected