भाजपच्या आमदारांचे निलंबन रद्द;
सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का
प्रतिनिधी : संजय पंडित
भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द; सुप्रीम कोर्टाचा निर्णय....
महाराष्ट्र भाजपच्या ११ आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाने आज मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या सर्व १२ आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राडा केल्याने, अध्यक्षांना शिवीगाळ केल्याने तसंच तत्कालिन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्याचा आरोप करत, भाजपच्या बारा आमदारांचं ५ जुलै २०२१ रोजी वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं होतं.
यामधे आमदार संजय कुटे,आशिष शेलार,अभिमन्यू पवार,गिरीश महाजन,अतुल भातखळकर,पराग आळवणी,हरीश पिंपळी,राम सातपुते,जयकुमार रावल,योगेश सागर,नारायण कुचे,किर्तिकुमार भांगडीया यांचा समावेश होता. या निलंबन प्रकरणी भाजपने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने आज ऐतिहासिक निकाल देत भाजपच्या या सर्व आमदारांचं निलंबन रद्द केलं आहे.
stay connected