जळगाव जिल्हा रुग्णालयात व वैद्यकीय महाविद्यालयात क्रिटीकल परिस्थितीत यशस्वी डिलेव्हरी करणा-या देवदूत डॉक्टरांचा सत्कार
जळगाव जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे काल दिनांक २२ जानेवारी २२२२ रोजी यावल येथील सुमय्या फिरोज खाटीक या महिलेची अडलेली डिलेव्हरी यशस्वी रित्या पूर्ण केल्याबद्दल येथील डॉक्टरांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
काल रोजी यावल येथील सुमय्या फिरोज खाटीक ही महिला जळगाव येथे डिलेव्हरीसाठी आली असता जळगाव शहरातील नामांकित खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल होऊ इच्छीत असतांना तिला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचार मिळाले नाहीत. तब्बेत क्रिटीकल आहे. या सबबी खाली उपचार न करता परत पाठविण्यात आले. सदर महिलेची प्रकृती अतिशय खालावत होती. बाळ व बाळाच्या आईच्या जिवीताला धोका होता. पण कोणत्याही खाजगी दवाखान्यात उपचार मिळाले नाहीत. शेवटी जळगाव सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले. व सिव्हील हॉस्पिटलचे डिलिव्हरी विभाग प्रमुख डॉ. बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सोनाली मुपडे, डॉ. श्रध्दा राणे, डॉ. राजश्री एजगे, डॉ. वृशाली राठोड, डॉ. प्रियंका रोटे, व डॉ. हेमंत रोटे यांनी परिस्थिती यशस्वीरित्या हाताळून या पेशंटची डिलेव्हरी यशस्वी रित्या पूर्ण केली. विशेषतः अतिशय क्रिटीकल परिस्थिती असतांना देखील डिलेव्हरी नॉर्मल करुन बाळ व बाळंतीणीचे सुखरुप पणे प्राण वाचविले. या बद्दल या डॉक्टरांचे ऋण व्यक्त करण्यासाठी सुप्रिम कॉलनी एमआयडीसी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व न्यू स्टार व्यायाम शाळेचे संचालक युसूफ खाटीक, पत्रकार अशपाक शहा आणि आरोग्य रक्षक डॉ. मन्सूरबाबा यांनी सत्कार करुन ऋण व्यक्त केले आहे.
सरकारी हॉस्पिटल मध्ये पेशंटकडे दुर्लक्ष होते. अशी जनमानसात अफवा आहे. परंतू या घटनेवरून सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार होतात. हे अधोरेखित होते. क्रिटीकल परिस्थितीत डिलेव्हरी यशस्वी करून पेशंटचे व बाळाचे प्राण वाचवणा-या या देवदूत डॉक्टरांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
stay connected