भिवंडीत कोळश्याणे भरलेला ट्रक झोपडीवर कोसळला
तीन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू
हृदय पिळवटून टाकणारी घटना...
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.२७भिवंडी ( ठाणे) : विटभट्टीवर कोळसा भरलेल्या ट्रकची ट्रॉली झोपडीवर कोसळल्याने तीन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास भिवंडीत घडली आहे. भिवंडी तालुक्यातील टेंभवली गावच्या हद्दीतील वीटभट्टी वरील हृदयद्रावक घटना आहे. कंटेनरमधून कोळसा खाली करत असताना कंटेनरचा शॉकअल अचानक तुटला आणि कोळशाने भरलेली ट्रॉली मजुरांच्या झोपडीवर कोसळली. या तिन्ही चिमुकल्या झोपडीत झोपलेल्या असतानाच अचानक त्यांच्यावर काळाने घाला घातला. लावण्या(७), अमिषा (६) आणि प्रीती (३) अशी अपघातात मृत्यू झालेल्या चिमुरड्यांची नावे आहेत. या घटनेमुळे वीटभट्टी मजूर बाळाराम वळवी यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.
कंटेनरमधून कोळसा खाली करताना अपघात घडला
बाळाराम वळवी हे भिवंडीतील टेंभवली गावातील वीटभट्टीवर एका झोपड्यात आपल्या कुटुंबासोबत राहतात. मंगळवारी रात्रीच्या सुमारास वीटभट्टीसाठी लागणारा कोळसा वळवी यांच्या झोपडीजवळ ट्रकमधून खाली करण्यात येत होता. यावेळी वळी यांची पत्नी जेवण करीत होती तर चार मुले झोपली होती. कोळसा खाली करत असतानाच कंटेनरचा शॉकअल तुटल्याने ट्रॉलीसहीत कोळसा झोपडीवर कोसळला. या दुर्घटनेत झोपेत असलेल्या वळवी यांच्या तीन मुली जागीच ठार झाल्या तर वळवी पती-पत्नी आणि मुलाला वाचवण्यात स्थानिक मजुरांना यश आले आहे. याप्रकरणी भिवंडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
stay connected