*बांधावरच्या कुपाटी वरून लोखंडी गज,काठ्या व कुर्हाडीने तुंबळ मारामारी , सात जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*
बांधावरच्या कुपाटी वरून तुंबळ हाणामारी
केज (प्रतिनिधी):- केज तालुक्यातील उंदरी येथे शेताच्या बांधावरील कुंपण जाळल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांत काठ्या लोखंडी गज व कुऱ्हाडीने तुंबळ हाणामारी झाली असून सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २१ जानेवारी रोजी ६:३० वा. उंदरी ता. केज येथील पवार वस्तीच्या शिवारामधे हा प्रकार झाला आहे. या प्रकरणी एकुण सात जणांच्या विरोधात युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. बांधावरच्या कुपाटीच्या कारणावरून तुंबळ मारामारी झाली आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध गु.र.नं. १६/२०२२ भा.दं.वि. १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३,५०४, ५०६ याप्रमाणे गुन्हा नोंद करून सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राठोड हे पुढील तपास करीत आहेत.
stay connected