S.C. S.T. बांधवांची ओबीसीच्या आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात बैठक.
करमाळा (प्रतिनिधी- राजु सय्यद )
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मा. नागेश (दादा) कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वाखाली दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12:30 वा.शासकीय विश्रामगृह, सात विहिरीजवळ ओबीसीच्या आरक्षण संदर्भात नियोजन बैठक घेण्यात आली.
यावेळी दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ,आर.पी.आय. तालुका युवक अध्यक्ष यशपाल कांबळे, भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आर आर पाटील व पदाधिकारी, भिमसेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयकुमार गोकुळ कांबळे, मातंग एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष शरद पवार, महादेव रणदिवे. धनगर समाज तालुका अध्यक्ष अमित धायतोंडे, सामाजिक कार्यकर्ते बाबा ननवरे. ज्ञानदेव अनारसे. अरुण माने दिनेश दळवी. सुहास ओहाळ. नानासाहेब कांबळे. बनसोडे सर. अतुल दुधे. गौतम खरात. दिनेश माने. सुरज खरात. रणजित कांबळे. भीमराव रणदिवे .रुपेश सरतापे. दत्ता बडेकर .नामदेव वाघमारे. कयूम शेख .सचिन भोसले .अमर लोंढे साहिल कांबळे. बलभीम गायकवाड .सावता हरी कांबळे
आदी मान्यवर उपस्थित होते
सर्व मान्यवरांनी ओबीसी आरक्षणाबाबत आपले मत व्यक्त केले मा. नागेश कांबळे म्हटले की भारतीय संविधानाला धरून ओबीसी बांधवांना आरक्षण दिले पाहिजे सरकार कडून विनाकारण ओबीसी बांधवांना आरक्षण देण्यास विलंब होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव कांबळे सर यांनी केले व आभार प्रशांत कांबळे यांनी मानले.
stay connected