*19 मार्चला किसानपुत्रांचा उपवास*
@ अमर हबीब
19 मार्च- हा शेतकरी सहवेदनेचा दिवस
19 मार्च- शेतकरी स्वातंत्र्यासाठी संकल्प करायचा दिवस
19 मार्च- हा साहेबराव करपे कुटुंबियांच्या सामूहिक आत्महत्येचा स्मृती दिन
यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे यांच्या संपूर्ण कुटुंबाने 19 मार्च 1986 रोजी सामूहिक आत्महत्या केली होती. त्या आधीही शेतकऱयांच्या आत्महत्या होत आल्या आहेत. पण अलीकडच्या काळातील नोंद झालेली ही भीषण आत्महत्या आहे.
सरकारी आकडेवारी नुसार भारतात सुमारे पाच लाख शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत.
शेतकऱयांच्या आत्महत्या या आत्महत्या नसून हे सरकारने जाणीवपूर्वक केलेले नरसंहार आहे.
कारण या आत्महत्यांचे मूळ कारण सीलिंग, आवश्यक वस्तू व अधिग्रहण हे कायदे आहेत. हे कायदे सरकारने केले. पक्ष बदलले तरी हे कायदे रद्द झाले नाहीत. म्हणून शेतकरी आत्महत्यांची जबाबदारी सर्व सत्ताधाऱयांची आहे.
शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे व शेतकरीविरोधी नरभक्षी कायदे तात्काळ रद्द करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे!
19 मार्च या दिवशी देश-विदेशातील लाखो लोक उपवास/अन्नत्याग/उपोषण करतात.
- हा उपवास देवाधर्माचा नाही.
- हा उपवास कर्मकांड नाही.
- हा उपवास राजकारण नाही.
- हा उपवास भीक मागण्यासाठी देखील नाही.
हा उपवास एक सहवेदना आहे.
संकल्पाचा निर्धार आहे!
19 मार्च रोजी प्रत्येक किसानपुत्राने (शेतकऱयांच्या मुला मुलींनी) एक दिवस उपवास करावा. अन्नदात्यासाठी अन्नत्याग करावा.
असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे.
---
19 मार्च रोजी मी (अमर हबीब) आंबाजोगाई येथे उपवास करणार आहे.
19 मार्च रोजी मुकुंदराज सभागृहात किसानपुत्रांचा मेळावा होणार आहे.
हा मेळावा दुपारी 2.30 वाजता सुरू होईल.
उपोषणाची सांगता 5.30 वाजता सरबताने होईल.
त्या नंतर सर्वांना खिचडीचे भोजन दिले जाणार आहे.
---
19 मार्चच्या निमित्ताने पानगाव येथील रमेश मुगे स्मारकापासून पदयात्रा निघणार आहे. यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील सुमारे 50 किसानपुत्र सहभागी होणार आहेत. या शिवाय अनेक स्थानिक लोक सहभागी होणार आहेत. घाटनांदूर, पूस, गिरवली, पिंपळा मार्गे पदयात्रा आंबाजोगाईला पोचणार आहे. या पदयात्रेत डॉ राजीव बसरगेकर, सुभाष कच्छवे, रामकृष्ण रुद्राक्ष, कालिदास आपेट आदी सहभागी होणार आहेत.
---
19 मार्चला उपवास करून शेतकरी सहवेदना व्यक्त करून शेतकरी स्वातंत्र्याचा निर्धार करू!
●
अमर हबीब, 8411909909
किसानपुत्र आंदोलन
stay connected